Top News

आदिवासीं कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलन तर्फे चालू असलेल्या साकळी उपोषणाला भेट.

आदिवासीं कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलन तर्फे चालू असलेल्या साकळी उपोषणाला भेट.

कोळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणार.- श्री.महेश देवकते


चंद्रपूर:- आदिवासीं कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलन  साकळी उपोषण मागील 14 दिवसा पासून कलेक्टर ऑफीसचे मागील बाजूस सुरु आहे. या आंदोलनाला मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहिर साहेब व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. देवराव भोंगळे यांनी भेट देऊन मा. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना सूचना केल्यानुसार आज  शिष्टमंडळासह बैठक बोलावली होती. ती बैठक विस कलमी सभागृहात पार पडली.


त्या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी श्री. माने साहेब, नायब तहसिलदार श्री.विनोद डोनगावकर साहेब, जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. महेशजी देवकते, आंदोलक अध्यक्ष श्री.  ज्ञानोबा येलकेवाड, शिवाजी बोईनवाड,मारोती पुलेवाड, गणपत येंचेवाड, नरेश मामीलवाड, श्रीहरी मामीलवाड,विनायक मामीलवाड,बाबू मामीलवाड,बालाजी येलेबोईनवाड दत्ता संबटवाड, लक्ष्मण येंचेवाड,बळीराम संबटवाड माधव उडतेवाड, लक्ष्मण भोईनवाड  निलेश घंटेवाड, विनोद नंदेवाड, रमेश गुडमेवाड, धोंडीबा कजेवाड, सोपान कजेवाड, विनायक अणेबोईनवाड, आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विविध मागण्यावर चर्चा होऊन, प्रशासनाने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत, आंदोलनकर्ते उपोषण मागे घ्यायचे की, कसे यावर राज्य समितीला विचारून निर्णय घेणार असल्याचे गणपत येंचेवाड यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने