नवी दिल्ली:- राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार निश्चित केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
एनडीएच्या संसदीय मंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.