बिअर बार उद्घाटनप्रसंगी बारमालकाकडून मारहाण? chandrapur


घरमालकाच्या सांगण्यावरून विद्यार्थी गेले होते जेवायला

ब्रम्हपुरी:- शहरातील एका बिअर बारच्या उद्घाटन कार्यक्रमात घरमालकाच्या सांगण्यावरून हजर झालेल्या दोन विद्यार्थ्यांना बारमालकाने भोजनप्रसंगी मारहाण केल्याची घटना शनिवारी दि. ३ फेब्रुवारीला उघडकीस आली. या घटनेत एक जखमी झाला. विद्यार्थी शिकत असल्याने त्यांनी या घटनेची तक्रार पोलिसांत नोंदविण्याचे टाळल्याचे समजते. मात्र या प्रकाराची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

ब्रम्हपुरी शहरात बुधवारी दि. ३१ जानेवारीला सायंकाळी जयस्वाल बार अँड रेस्टॉरंट या बिअर बारच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बारमालकाने यासाठी शहरातील अनेकांना निमंत्रित केले. बिअर बार परिसराच्या मागे राहत असलेले स्थानिक रहिवासी मनोहर तायडे यांनाही मालकाने बोलावले होते.

तायडे यांच्या घरी काही विद्यार्थी भाड्याने राहून मेसमध्ये जेवण करतात. ते शहरातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात शिक्षण घेत आहेत. घरमालकाने त्या दोघांनाही माझ्यासोबत कार्यक्रमाला चला, असे सांगितल्याने निमंत्रणावरून घरमालक बिअर बार उ‌द्घाटनाच्या कार्यक्रम हजर झाले.

दरम्यान, भोजन सुरू असताना बारमालकाने विद्यार्थ्यांची विचारपूस न करता मारहाण केली. यात एक विद्यार्थी जखमी झाला. ही माहिती परिसरातील युवकांना मिळाल्याने त्यांनी बिअर बारसमोर गर्दी केली. काही युवकांनी बारमालकाला जाबही विचारला. मात्र, शिवीगाळ करून युवकांना हाकलल्याची चर्चा परिसरात पसरताच काही वेळाने देलनवाडी वॉर्डातील काही संतप्त नागरिक आले. बिअर बारसमोर एकत्र दृश्य पाहिल्यानंतर कार्यक्रम आटोपता वॉर्डातील नागरिकांच्या संतापाने गुरुवारी दि. १ फेब्रुवारीला बार बंद ठेवण्यात आले होते. या प्रकाराची चर्चा ब्रह्मपुरी शहरात दबक्या आवाजात सुरू आहे.

बिअर बारच्या उ‌द्घाटनाप्रसंगी सहा-सात विद्यार्थी हे आमच्या समाजाच्या पाहुण्यांसोबत मिळून जेवण करत दिसून आले. त्यामुळे माझ्याकडून चुकीचा प्रकार घडला. माझी चूक लक्षात आली. घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
अश्विन ऊर्फ चिंटू जयस्वाल, जयस्वाल बार अँड रेस्टॉरंट, ब्रम्हपुरी 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने