चेक ठाणा येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश

Bhairav Diwase
पोंभूर्णा : तालुक्यातील चेक ठाणा येथील भाजपाच्या अनेक युवा कार्यकर्त्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख आशिषभाऊ कावटवार यांनी भगवा दुप्पटा घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल करून घेतला. हा कार्यक्रम चेक ठाणा येथे संपन्न झाला.

पक्षप्रवेश सोहळ्याच्या मार्गदर्शन करताना आशिषभाऊ कावटवार यांनी मार्गदर्शनात आपण शिवसेना पक्षातील कुटुंबाचे सदस्य झालात याचा मला मनापासून आनंद वाटतो म्हणून तुम्ही सर्वांचे मनापासून अभिनंदन व स्वागत करतो. आपण सर्वांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकारण व 20%राजकारण हा महामंत्र ध्यानी घेऊन गोरगरीब मायबाप जनतेची सेवा करावी.शिवसेना पक्ष तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. पक्षप्रवेश तालुका प्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात व युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार यांचा उपस्थित पक्षप्रवेश पार पडला.
प्रवेश करणारे चेक ठाणा येथील भजपाचे युवा कार्यकर्ते क्षितेश तोडसाम, महेश वाढई, प्रदिप शिंदे, अमोल गौरकर, जयपाल वाढाई, अक्षय गौरकर, प्रशांत झाडे, राजू गुरनुले, गजानन तिवडे, मारोती वाढई, देवाजी सोनटक्के, सुभाष तलांडे, अमित इटेकर,प्रवीण सोनटक्के, प्रशांत मडावी ,रोशन वाकडे, चेतन मडावी, अंकुश मशाखत्री, मंगला मडावी, अनिता तलांडे, सईबाई सिडाम, लाता वधई, मिनाक्षी तोडसम, लीलाबाई लेनगुरे, योगेश भिमेकर व आदी अनेक युवक व महिलांची मोठ्या संख्येने पक्षप्रवेश घेतले.यावेळी युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.