लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता?
चंद्रपूर:- आर्णी लोकसभा मतदार संघात एकीकडे भाजपाने प्रचाराचा नारळ फोडला. तर काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेस कुणाला उमेदवारी देतेय याकडे लक्ष लागले आहे.
अश्यातच सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील दोन महिला नेत्यांची नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanokar) यांना उमेदवारी दिली जाईल.
या जागेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यादेखील इच्छूक होत्या. मात्र, गेल्यावेळी बाळू धानोरकर यांनी मोदी लाटेतही चंद्रपूर मतदारसंघ काँग्रेसला जिंकवून दिला होता. त्यामुळे आता पक्षाने त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाच चंद्रपूरमधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. आज किंवा उद्या अधिकृत घोषणा शक्यता आहे.