सुधीर मुनगंटीवार यांनी फोडला प्रचाराचा नारळ #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase

चंद्रपूर:- भाजपकडून 13 मार्चला लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांची वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर करून भारतीय जनता पार्टीने पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या दृष्टीने आपले पहिले पाऊल टाकले. दिनांक १८ मार्चला सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक गांधी चौक येथे आयोजित आशीर्वचन सभेमध्ये आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.

वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवार निश्चिती व प्रचाराचा नारळ फोडण्यात आघाडी घेतली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर नगरीत प्रथम आगमना प्रित्यर्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आशीर्वचन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रचंड उत्साह, ठिकठिकाणी झालेले भव्य स्वागत आणि या स्वागताला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी विकास कामातूनच जनतेच्या प्रेमाच व्याज फेडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल व राज्याप्रमाणेच केंद्रातील विविध योजनांचा उपयोग आपल्या लोकसभा क्षेत्रातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असा विश्वास देत विविध समाजातील धर्मगुरूंच्या साक्षीने मतपेरणी करण्यास त्यांनी सुरुवात केली.