Top News

ढोरवासा येथे शिक्षण परिषद तथा बाल रक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न


भद्रावती:- नुकतेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढोरवासा येथे ढोरवासा केंद्राची दुसरी शिक्षण परिषद तथा बाल रक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण घेण्यात आली.


    शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री भारत गायकवाड सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुरसा शाळेचे मुख्याध्यापक श्री उपेंद्र दमके सर व कुनाडा शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी ज्योती नाकाडे मॅडम उपस्थित होत्या.
   अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शिक्षण परिषदेची सुरुवात करण्यात आली.
  सर्वप्रथम माननीय श्री गायकवाड सर यांनी शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केले तसेच बालरक्षक प्रशिक्षणाअंतर्गत बालरक्षक चळवळ याविषयी विस्तृत असे मार्गदर्शन केले. बाल रक्षक संकल्पना काय आहे बालकांचे हक्क, संरक्षण अधिनियम, कायदे, याविषयी सखोल अशी माहिती दिली.तसेच विविध उदाहरणाद्वारे मानवी जीवनातील लोप पावत असलेली मूल्ये याविषयी जाणीव जागृती निर्माण केली.
    श्री चौधरी सर यांनी निपून भारत जीआर परत एकदा सर्वांसमोर वाचन करून या संदर्भातील काही अडचणी दूर केल्या व आपली शाळा निपुण कशाप्रकारे करता येईल . शाळेत कोण कोणते उपक्रम घेता येईल आणि त्याचा विद्यार्थ्यांना कश्याप्रकारे फायदा होईल याविषयी चर्चा करण्यात आली.
    श्री गाडगे सर यांनी उल्हास विषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले तसेच NILP बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व केंद्रप्रमुख गायकवाड सर यांच्या द्वारे त्यांचा आढावा घेण्यात आला.
    मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उप क्रमामध्ये सहभागी होऊन चांगल्यात चांगल्या प्रकारे शाळा स्वच्छ व सुंदर करून बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करावा असे सांगण्यात आले.
     केंद्र परिषदेला भद्रावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय डॉ. श्री प्रकाश महाकाळकर साहेब तसेच भद्रावती बीटाचे विस्तार अधिकारी माननीय श्री विद्ये सर यांनी भेट दिली. डॉ. महाकाळकर साहेब यांनी शिक्षकांशी प्रशासनाविषयी काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली तसेच शिक्षकांना मार्गदर्शन केले.
    श्री विद्ये सर यांनी ढोरवासा केंद्रातील शाळा निपुण शाळा होण्यासाठी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या
      अगदी हसत खेळत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत आपले अनुभव शेअर करत पुरणपोळीचा आस्वाद घेऊन शिक्षकांनी शिक्षण परिषदेची रजा घेतली.
   गायकवाड सरांनी शिक्षकांच्या डोक्यावरील ताण कमी करत विविध प्रकारचे अनुभव शेअर करत हसत खेळत आणि हसवत शिक्षण परिषदेचा उद्देश साध्य केला.
    परिषदेचे सूत्रसंचालन ढोरवासा शाळेचे शिक्षक श्री दिनकर गेडाम सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री अजय गाडगे सर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने