कुलगुरूंच्या मनमानी कारभाराविरोधात सिनेट सदस्यांचा सभात्याग #chandrapur #gadchiroli #Gondwanauniversity

Bhairav Diwase
चंद्रपूर:- दिनांक 14 मार्च 2024 रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभा बैठक सुरू असताना सत्र 2024-25 चे अंदाज पत्राला मंजुरी देण्याची बाब चर्चेला आली असताना बजेट मधील तरतुदीची व प्रत्यक्ष खर्च यात खूप मोठी तफावत होती. चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्र तयार केले गेले आहे.


अंदाजपत्र तयार करताना University Account Cond कलम 10(12), 10 (13) चे पालन झालेले नाही असे आक्षेप घेतले असता कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी अधिसभा सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा "मी तयार केलेल्या बजेट जसेचा तसा तुम्हाला मंजूर करावा लागेल यात कोणताही बदल होणार नाही" असा धमकी वजा आदेश दिला. त्यामुळे कुलगुरूंच्या अश्या अपमानास्पद व अरेरावीपणाचा जाहीर निषेध करत सिनेट सदस्यांनी सभात्याग केला.

यात प्रा. दिलीप चौधरी, अजय लोंढे प्रा. निलेश बेलखेडे, दीपक धोपटे, प्रा. डॉ. सतीश कन्नाके, प्रा. प्रवीण जोगी, प्रा. मिलिंद भगत, प्रा. संजय साबळे, प्रा. एन एस वाढवे, डॉ. विवेक शिंदे यांनी सभा त्यास केला. कुलगुरूंच्या मनमानीचा आक्रमकपणे सभात्याग करून सदस्यांनी सभागृहाच्या बाहेर येऊन कुलगुरूच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच कुलगुरूंची तक्रार राज्यपाल महोदय यांच्याकडे केली जाईल असे सांगितले.