Top News

शहरातील तुकूम परिसरात "अग्नीतांडव" #chandrapur #firenews

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील A To Z बाजार सेल ला सकाळी 7 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत A To Z सेल पूर्णपणे जळून खाक झाले असून यात कोट्यावाधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. 

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील A To Z बाजार सेल ला सकाळी 7 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आज शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आग विझवण्याकरिता 4 अग्निशामक गाड्यांना प्रचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाच्या जवानाने आगीवर नियंत्रण ठेवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले. परिसरातील नागरिकांनी घरातील पाण्याच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग इतकी भयानक होती की शर्तीचे प्रयत्न व्यर्थ ठरले. आतीने रौद्ररूप धारण केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.


Also Read:- चंद्रपूर शहरातील तुकूम परीसरात भीषण आग 

घटनास्थळी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन उपस्थित होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती, गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा मोठा फोर्स फाटा तैनात होता.


संजय गोविंदराव चवरे, सव्हे नं. 106/1, प्लॉट नं. 212 मौजा दे. गो. रेय्यतवारी चंद्रपूर राहणार ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर यांनी आपल्या जागेवर मागील 3 वर्षापासून A to Z सेल, रेस्टॉरेन्ट हॉटेल, पॉपीन्स बिर शॉपी सुरु केले आहे. डिपी लावण्यासाठी महानगरपालिकेची कोणतेही परवानगी घेण्यात आले नाही असा आरोप परीसरातील नागरीकांनी केला आहे. डी. पी. लावलेल्या ठिकाणापासुन 3-4 फुटांवर रहिवाश्यांचे वास्तव्य आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने