Top News

फेजबुकवर फेक आयडीद्वारे प्रतिष्ठित व्यक्तींची बदनामी; पोलिसात तक्रार दाखल #chandrapur #Korpana #Facebookfakeid


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना 
कोरपना:- कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरातील काही समाजकंटकांनी फेजबुकवर निनावी फेक आयडी तयार करून शहरातील राजकीय प्रतिष्ठित महिल, पुरूष, सामाजिक कार्यकर्ते तथा काही पत्रकारांना टार्गेट करून त्यांच्याविषयी अश्लील, अपमानजनक व बदनामीकारक मजकुराची पोस्ट टाकून अब्रुंशी खेळणे सुरू केले आहेत.

सायबर सेलला आव्हान देणारे हे कृत्य असून अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याची तसेच यांच्या फेजबुक पोस्टला कॉमेंट करून यांना प्रोत्साहन देणाऱ्या फ्रेंड्सवर सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे.


शहरातील सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे हे प्रयत्न असून सायबर सेलने लवकरात लवकर यासंदर्भात योग्य ती पावले उचलून कारवाई करण्याची मागणी पत्रकार सैय्यद मुम्ताज़ अली यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

कायद्यानुसार सोशल मीडियावर आयडी तयार करताना संबंधिताने आपली संपूर्ण माहिती {ओळख}जाहीर करणे अनिवार्य आहे. मात्र येथे काही समाजकंटकांनी 'गडचांदूराचा जेष्ठ योद्धा, गडचांदूरचा सम्राट, गडचांदूरचा महाराजा' या नावाने ओळख नसलेली निनावी {फेक आयडी} फेजबुकवर तयार करून कोणतेही ठोस पुरावे नसताना बिनबुडाची व अपमानास्पद पोस्ट टाकून येथील प्रतिष्ठा नागरिकांना समाजात विनाकारण बदनाम करण्याचा जणू चंगच बांधला आहे. स्वत:ची ओळख लपवून, काही राजकीय महिला-पुरूष, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकारांविषयी उलटसुलट मकुराचे लिखाण करून अपमानित केले जात आहेत.


विविध प्रकारच्या धमक्या सुद्धा फेजबुकवरून दिल्या जात असल्याने यांच्या जाचाला कंटाळलेल्या शहरातील काही त्रस्त राजकीय व्यक्ती आरोप प्रत्यारोप करत याचे खापर एकमेकांवर फोडत असल्याचे दिसून येत आहे. अशा समाजकंटक फेक आयडी चालकांच्या कृत्यामुळे शहरातील सलोख्याचे वातावरण विनाकारण गढूळ होत असून शंकायुक्त संतापाची लाट पसरली आहे.

कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना फेक आयडी चालकाच्या अशा बेकायदेशीर कृत्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे लवकरात लवकर 'गडचांदूरचा जेष्ठ योद्धा, गडचांदूरचा सम्राट व गडचांदूरचा महाराज' या नावाचे निनावी फेजबुकवरील फेक आयडी चालकाच्या मुसक्या आवळून कायदेशीर कारवाई करावी, जेनेकरून निष्पाप लोकांचा मनस्ताप दूर होईल, अशी विनंती वजा मागणी पत्रकार सैय्यद मुम्ताज़ अली यांनी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन पाठवून सदर प्रकरणाची माहिती देण्यात आली असून कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने