पाथरी येथील भ्रष्टाचारा प्रकरणी बिडीओ कडे तक्रार #chandrapur #saoli

सचिवांची चौकशी करून गुन्हा दाखल करा सरपंच अनिता ठीकरे यांची मागणी
सावली:- तालुक्यातील पाथरी ग्रामपंचायत ११ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारी विकासकामे पाहता अनेक अधिकाऱ्यांनी या ग्रामपंचायतीचे कौतुक केले. परंतु सचिवांनी डिजीटल स्वाक्षरीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे पाथरी गाव विकसित होत असताना ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची कीड लागल्याचेही दिसत आहे.

येथील सरपंचांना विश्वासात न घेता प्रलंबित कामांच्या व्हाउचरवर डिजीटल स्वाक्षरीच्या माध्यमातून सचिवांनी पैसे काढले असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार बीडीओंकडे करण्यात आली आहे. सरपंचांच्या तक्रारीवरून योग्य चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याने आता या भ्रष्टाचारात कुणाकुणाचे पाय बुडालेले आहेत व किती व्यक्तीवर कारवाई होईल, याकडे लक्ष लागले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने