Top News

भद्रावतीच्या पंकज इटकेलवार, महेश मानकर यांची गरुड झेप


मुंबईच्या जागतिक स्तरावरील जहागीर आर्ट गॅलरीत कला प्रदर्शन
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावतीच्या ऐतिहासिक नगरीतील मायभूमीत बालपणापासून कुंचल्याच्या माध्यमातून खेळकर वृत्तीने प्रायमरी कलाविषयक प्रशिक्षण घेत भद्रावती येथील आदिवासी हस्तकला व चित्रकला केंद्र तथा कला अकादमीत रमलेला पुढे कला क्षेत्रातील उच्च शिक्षण घेत महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कुंचल्याच्या माध्यमातून आपली छाप सोडणारा चित्रकार कलावंत पंकज इटकेलवार त्याचबरोबर, महेश मानकर, नागपूर ,भुवनेश्वर पुणे आणि वाराणसी येथील प्रत्येकी एका कलाकाराचे समूह कला प्रदर्शन जगप्रसिद्ध असलेल्या मुंबईतील जँहागीर आर्ट गॅलरी १९मार्चला सुरू होणार असून, सदर प्रदर्शनीचे उद्घाटन दिनांक १९मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता प्रसिद्ध कला दिग्दर्शक संतोष प्रजापती, मुंबई यांच्या हस्ते होणार आहे. सदर प्रदर्शन १९मार्च ते २५ मार्च,२०२४ दरम्यान ऑडिटोरियम हॉल मध्ये सर्वांसाठी खुले राहील. चार चित्रकार व दोन शिल्पकार युवा कलावंतांनी आपआपली अभिव्यक्ती कलेच्या विविध माध्यमातून अभिव्यक्त केली आहे. समविचारी व भविष्यकाळाचा कलाविषयक वेध घेणारा नरोत्तम दास, पंकज इटकेलवार, बाबर शरीफ, महेश मानकर, आकाश सूर्यवंशी आणि रमेश चंद्रा या कलावंतांचा समूह आपली कला प्रदर्शित करणार आहे.

पंकज इटकेलवार यांची चित्रे आजच्या वास्तव्यचित्रावर भाष्य करणारी आहेत. विचार प्रवर्तक व प्रतिमांना, आजूबाजूला दिसणाऱ्या स्थित्यंतराला आपल्या कलाकृतीचा विषय करणे हे पंकज या मुद्रा चित्रकाराचे वैशिष्ट्य आहे. मुद्रा चित्र माध्यमात सहजपणे आपले विचार अभिव्यक्त करतो. या प्रदर्शनात मुद्रा चित्र माध्यमातील अनेक प्रकारातून विशिष्ट आकाराच्या साह्याने निसर्गातील स्पंदने ,पोत आणि भावना व्यक्त करणारी मुद्रा चित्रे प्रदर्शित केली आहेत. प्रा .पंकज इटकेलवार नागपुरातील शासकीय कला महाविद्यालयात मुद्राचित्र अध्यापक असून, देश-विदेशातील विविध प्रदर्शनात पंकज इटकेलवार यांचा सहभाग राहिला आहे हे भद्रावतीकरांसाठी विशेष नाविन्यपूर्ण बाब आहे.


भूतकाळ ,भविष्यकाळ तर कधी तार्किक -अतार्किक संकल्पनांच्या विषयावर चित्र करणारा बाबर शरीफ हा नागपूरचा चित्रकार आहे. अमूर्त माध्यमातून स्वतःचा चित्रावकाश काव्यात्मक पद्धतीने रूपकारासह व्यक्त होतो. म्हणून कवितेच्या जवळ जाणारी चित्रे निसर्गातून आली असावीत. काहीतरी सांगू पाहणारी ही चित्रे विविध प्रदर्शनातून ठळकपणे रसिकांना आकर्षित करतात.

अमूर्त संकल्पना आणि विषयाची वास्तव्य मांडणी करणारा महेश मानकर हा भद्रावतीचा चित्रकार आहे. कधी जलरंग तर कधी अँक्रेलिक माध्यमात राजकीय, सामाजिक, नीती आणि अनिती संकल्पना चित्रीत करतो. अवतीभवती दिसणारी दृश्ये अति वास्तववादी पद्धतीने कलात्मकरीत्या मांडणे हे महेश मानकरच्या चित्रांचे वैशिष्ट्य आहे. विविध प्रदर्शनातून यांची चित्रे देश विदेशात प्रदर्शित झालेली आहेत.
भारतीय पौराणिक कथा आणि मिथकामधून तर कधी आदिम लोक संस्कृतीशी आपले नाते सांगणारा नरोत्तम दास भुवनेश्वर येथे कला निर्मितीत व्यस्त असतो. गेले काही काळ भद्रावती येथील ग्रामोदय संघात अध्यापनाची जबाबदारी सांभाळत पुढे भुवनेश्वर येथे स्थित झालेला हा कलावंत टेराकोटा, दगड धातूमध्ये शिल्प निर्मिती करताना टेराकोटामध्ये स्वतःची स्वतंत्रपणे ओळख निर्माण करणारा नरोत्तम अधिक प्रभावीपणे अभिव्यक्त होताना दिसतो. स्त्री, पशुपक्षी, निसर्ग रचना हे विषय घेऊन वैशिष्ट्यपूर्ण शिल्प निर्मिती करीत असतो. आधुनिक ते अलंकारिक, पारंपरिक व मानवी आकारातून आज पर्यंत अनेक कलाप्रदर्शनातून नरोत्तम यांची शिल्पे प्रदर्शित झालेली आहेत. ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कार नरोत्तम यांना मिळालेली आहेत.
रमेश चंद्रा वाराणसी येथील शिल्पकार आहेत. मानवी सबंध आणि ऊर्जा स्त्रोत दगडाच्या सधन माध्यमात शिल्पीत करतो. दैनंदिन जगण्याची लय, संवेदना सबंध विविध रचनाकारातून व्यक्त करणे हा या शिल्पकाराचा स्थायीभाव आहे. लाकूड, दगड ,सिरॅमिक इत्यादी माध्यमात कलाभिव्यक्ती दाखविणारा कलावंत स्वतःची सौंदर्यदृष्टी शिल्प रसिकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. विविध प्रदर्शनातून त्यांची शिल्पे पोहोचली आहेत.
प्रवासातील पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या तर कधी कल्पित प्रतिमांना आकाश सूर्यवंशी हा पुण्यातील चित्रकार कॅनवास वर चित्रबद्ध करतो. सायकल आणि इतर वाहने यांना मुख्य विषय धरून आठवणींचा आलेख मानवाकृतींच्या साहाय्याने चित्रीत करतो. या आठवणी कधी तरलवास्तव्य तर कधी स्वप्नवत रंगांच्या माध्यमातून व्यक्त करतो. संस्कृती मंत्रालयाची फेलोशिप व इतर अनेक प्रदर्शनातून त्यांची चित्रे प्रदर्शित झाली आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने