Top News

समृद्धी मार्गासाठी जिल्ह्यात मार्किंग, सर्व्हे नंबरही केले जाहीर #chandrapur #Samurddhihighway


चंद्रपूर जिल्ह्यातील "या" तालुक्यांतील गावे 'समृद्धी' ला जोडणार

चंद्रपूर:- नागपूर ते मुंबईला जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यापूर्वीच सुरू झाला आहे. या मार्गाला आता राज्यभरातील अन्य मार्ग जोडण्यात येणार आहेत, रस्ते विकास महामंडळाने तयार केलेल्या आराखड्यात जिल्ह्यातील पोंभुर्णा, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा या तालुक्यांतून नवा मार्ग जाणार आहे. ज्या-ज्या ठिकाणाहून मार्ग जाणार आहे त्या ठिकाणी मार्किंग केली आहे. यासंदर्भात शासनाने काढलेल्या राजपत्रात सर्व्हे क्रमांकही नमूद करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या सेलडोह इंटरचेंजवरून वरोरा, भद्रावती ते राजुरा, पोंभुर्णापर्यंत हा मार्ग जोडला जाणार आहे. समृद्धीलाच जोडणारा घुग्घुस इंटरचेंज ते चंद्रपूर जोडरस्ता राहणार आहे. या मार्गामुळे चंद्रपूरसह अन्य जिल्हांच्या विकासाला हातभार लागणार असून, नवनव्या उद्योगांनाही चालना मिळणार आहे.

"या" तालुक्यांतील गावांतून जाणार मार्ग

पोंभुर्णा:- घाटकुळ, चक ठानेवासना, नर्वगाव मोरे, चक खापरी, वेळवा चक, आष्ठा, चक, पोंभुर्णा, कसरगट्टा, बोर्डा दीक्षित, घनोटी तुकूम, चक घनोटी १.


बल्लारपूर:- कवडजाई, किन्ही, पळसगाव, कोर्टीमक्ता, जेवरा, ओगापूर, कळमना, आष्टी


भद्रावती:- मुरसा, घोनाड, पिंपरी, तेलवासा, डोरवासा, चारगाव, कुनाडा टोला, विज्रासन, कुरोडा, काँडा, खंडाळा रिठ, गोटाळा रीठ, चोपनरीठ

चंद्रपूर:- धानोरा, वडा, पांढरकवडा, शेनगाव, मुरसा, बोरगाव (रिठ)


वरोरा:- जामगाव खुर्द, जामगाव, परसोडा, चलनी, नमग्राम, खातोडा, सालोरी, बोरगाव देशपांडे, आसाळा, पिजदुरा, पाचगाव (ठाकरे), पांढरतळा, बोपगाव शिवनफळ, मांडवगुहाड, सुमठाना, चकवडापूर, चकसुर, मकसूर, चक मकसूर, बोडखा.

कोरपना:- नवेगाव, कोराही, नांदगाव, भोयेगाव.

राजुरा:- चुनाळा, बामनवाडा, गडपहखामी, धोपटाळा, माथरा, गोवरी, गोयेगाव, अंतरगाव (खुर्द), चिचोली (खुर्द), हिरापूर चिंचोली, साखरी, निमनी, वरोडा

माती परीक्षणासाठी

ज्या शेतातून मार्ग जाणार आहे. त्या त्या शेतातील तसेच परिसरातील मातीचे परीक्षण केले जाणार आहे. यासाठी विविध ठिकाणची माती नेण्यात आली आहे. या माती परीक्षणातून रस्त्याच्या मजबुतीसाठी विशेष प्रयत्न होणार आहे.

मार्किंगही केली

समृद्धीला जोडण्यासाठी जिल्ह्यातून आता नवीन मार्ग जाणार आहे. यासाठी रस्ते विकास महामंडळ, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतांमध्ये मार्किंग केली आहे. त्यामुळे आपले शेत जाणार हे आता शेतकऱ्यांना कळले आहे.

योग्य मोबदला द्या

जिल्ह्यातून समृद्धी मार्ग जाणार आहे. यासाठी अनेक शेतकयांच्या जमिनी जाणार आहेत. काही ठिकाणी शेतातील अगदी एक कोपराच जाणार आहे, तर काही शेतकऱ्यांच्या शेतातून मधोमध रस्ता जाणार आहे. रस्त्यासाठी जमीन अधिग्रहित करा. मात्र, शेतकयांना योग्य मोबदला द्या, अशी मागणी अन्नदाता एकता मंचच्या वतीने शासनाकडे केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने