एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले #Nagpur #chandrapur

Bhairav Diwase
नागपूर:- जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील निमखेडा गावात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. श्रीनिवास ईळुपुगंटी (वय 58) त्यांची पत्नी श्रीपद्मलता ईळुपुगंटी (वय 53) आणि मुलगा चंद्रशेखर श्रीनिवास ईळुपुगंटी (वय 29) अशी मृतकांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीनिवास ईळुपुगंटी हे व्यंकटेश राईस मीलचे मालक होते. घटनेच्या वेळी घरी श्रीनिवास ईळुपुगंटी यांचे सासु, सासरे खालच्या घरातील खोलीत झोपले होते. श्रीनिवास पत्नी सोबत वरच्या मजल्यावर तर मुलगा चंद्रशेखर बाजुला असलेल्या बेडरुममध्ये झोपलेला होता. तर मुलगा चंद्रशेखर याची पत्नी खालच्या हॉलमध्ये झोपून होती. मुलगा चंद्रशेखर याला पहाटे घरी बाहेरुन दुध आणायची सवय होती. रोजसारखा श्रीनिवास का उठला नाही म्हणून त्याची पत्नी बघायला गेली असता तिघेही जण मृतावस्थेत आढळून आले. या तीघांचा खून झाला की त्यांनी आत्महत्या केली या मागचे नेमके कारण कळू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पण, ते माग काढू शकले नाही. त्यामुळे या तिघांची हत्या की आत्महत्या याचे गुढ कायम आहे.