Top News

विदर्भ कॉलोनीत जागतिक महिला दिवस साजरा


ब्रम्हपुरी:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विदर्भ इस्टेट -3 येथे दिनांक 12/3/2024 रोजी जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.सर्वप्रथम विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मालार्पण करण्यात आले. 
   

   या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक वि. में. सोसायटीचे मुन्नी शेंडे, प्रमुख अतिथी म्हणून मा. पुण्यवता मेश्राम कोषाध्यक्ष वि. में. सोसायटी,संध्या पर्वते,पिसे मॅडम,कुर्वे मॅडम श्रुती बोरकर,सोनाली जुमनाके, वनमाला चौधरी,नंदिनी ढोंगे,बोकावार मॅडम मंचावर स्थानापन्न झालेले होते, या महिला दिनाच्या निमित्याने संगीत खुर्ची, तळ्यात - मळ्यात, अंताक्षरी स्पर्धा,टिकली स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा,वैयक्तिक डान्स, समूह डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. 
     
 यावेळी कार्यक्रमाकरिता परीक्षक म्हणून मिताक्षी मुरकुटे व राजू चंदनबावणे सर उपस्थित होते. सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले व सहभागी झालेल्याना सुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले,यावेळी पुण्यवता मेश्राम यांचे कडून पैठणी करिता लक्की ड्रा काढण्यात आला, लक्की ड्रा मध्ये स्वाती बावणे यांचे नाव आल्यामुळे त्यांना उपस्थित परीक्षकांचे हस्ते पैठणी देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ मेंटेनन्स सोसायटीच्या कोषाध्यक्ष सौ.पुण्यवता मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन मिनल धकाते मॅडम यांनी केले.यावेळी विदर्भ इस्टेट-3 येथील सर्व महिला भगिनी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाकरिता मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने