शासकीय अधिकाऱ्यांचा रजेचा अर्ज ऑनलाईन #chandrapur #sindewahi

रजेचा ऑफलाईन अर्ज स्वीकारू नये

सिंदेवाही:- महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकाविषयक बाबीसंदर्भात eHRMS (human resource management system) प्रणाली विकसित करण्यात आली असून त्या अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रशासकीय नियंत्रणाखालील अधिनस्थ कार्यालयाचा (उदा.आयुक्तालय, संचालनालय)समावेश या eHRMS प्रणालीत करण्यात येत आहे. सदर प्रणालीवर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकाविषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबधित विभागांना दिनांक 03 मार्च 2023 च्या परिपत्रकानुसार सूचना दिल्या होत्या.मात्र eHRMS प्रणालीमध्ये leave या सेकशन मध्ये रजेचा अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुविधा दिली आहे.तरी सुद्धा विभागामध्ये ऑनलाईन रजेचा अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे दिसून येत होते.त्यामुळे eHRMS प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वीत होण्याकरिता प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.या करिता सर्व मंत्रालय विभागांना सुचित केले असून त्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी(खुद्द व क्षेत्रीय) यांना दिनांक 1 एप्रिल 2024 पासून त्यांचे अर्ज eHRMS प्रणाली मार्फतच सादर करण्याच्या सूचना द्यावात.तसेच सर्व विभागांनी त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांचे रजा लेखे अद्ययावत ठेवावेत.कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाईन घेण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना शासन परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या