महाविकास आघाडीला चंद्रपुरात आणखी एक धक्का! #Chandrapur

Bhairav Diwase
0


चंद्रपूर शिवसेना (उबाठा) महिला आघाडी जिल्हा प्रमुख उज्वला नलगे यांचा भाजपात प्रवेश


चंद्रपूर:- मिळालेल्या माहितीनुसार हाविकास आघाडीला चंद्रपुरात आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी जिल्हा प्रमुख उज्वला नलगे यांनी शिवसेनेला रामराम करीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शकुंतला लॉन येथे पार पडला.


29 मार्चला पूर्व विदर्भात काँग्रेसला एक मोठा धक्का बसला होता. चंद्रपूर जिल्हा कॉग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पक्षाचा राजीनामा देत सुधीर मुनगंटीवार व बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)