चंद्रपूर:- यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असलेले महायुती सरकार मध्ये सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन करून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास येण्याची विनंती केली. नामांकन दाखल करण्यास या असे निमंत्रण दोन्ही नेत्यांनी दिले. मात्र, अगदीच वेळेवर फोन आल्याने व स्थानिक उमेदवाराने संपर्क केला नाही. त्यामुळे जाता आले नाही असे जोरगेवार म्हणाले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी घरी प्रत्यक्ष भेट देवून आम्माचा आशीर्वाद घेतला.
तरीही आमदार जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना “वेट अँड वॉच” असा सल्ला देत महायुती व महाविकास आघाडी यापैकी कुणीहीकडे सध्या जाऊ नका, असे म्हटले आहे.