अस्वलाच्या हल्यात इसम गंभीर जखमी #chandrapur#pombhurna

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील आंबेधानोरा जंगलालगत शेत शिवारात अस्वलाच्या हल्यात एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 18 मार्चला सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. संजय वासेकर असे गंभीर व्यक्तीचे नाव आहे.

आंबेधानोरा येथील संजय वासेकर हे जंगलालगत असलेल्या आपल्या शेतात सकाळच्या सुमारास गेले होते. शेतात काम करीत असताना अस्वलानी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात संजय वासेकर यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या. संजय वासेकर यांनी गावातील व्यक्तीला संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

 गावातील व्यक्ती व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या संजयला आधी ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे भरती करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. त्याचेवर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे.