चंद्रपूर:- ट्युशन क्लास घेण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून अत्याचार केला. एवढेच नाही तर बदनामीची धमकी देत तिच्याकडून सोन्याचे दागिने उकळल्याचा प्रकार चंद्रपुरात शनिवारी उघडकीस आला. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन त्या शिक्षकावर रामनगर पोलिस ठाण्यात पॉक्सो, कलम ३७६ तसेच खंडणीचा गुन्हा शुक्रवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला.
पीडित अल्पवयीन मुलगी त्या शिक्षकाकडे शिकवणीला जात होती. शिक्षकाने त्या पीडितेला आपल्या जाळ्यात ओढून मार्च २०२३ मध्ये अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने त्या पीडित मुलीकडून घरचे सोन्याचे दागिनेसुद्धा उकळले. याबाबत घरच्यांना कळताच बिंग फुटले. दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पुढील तपास एसडीपीओ सुधाकर यादव करत आहेत.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेतील आरोपीला शुक्रवारी (दि. 29) रामनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायाधिशांनी आरोपीची कारागृहात रवानगी केली. रामनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीच्या ठाण्याने आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीची मागणी मंजूर केली. त्यामुळे आरोपीची कारागृहात रवानगी केली.