प्रतिभाताई जाणिवपूर्वक वडेट्टीवार यांना ट्रोल तर करीत नाही नां?
चंद्रपूर:- चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. प्रत्येक गोष्टीला, तोडफोड करून आपल्या फायद्यासाठी वापरण्यात कांग्रेस आघाडीवर आहे. लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कार्यावर "ब्र" ही न काढता खोट्या गोष्टी कांग्रेस उमेदवार मतदारांना "भावनिक" होऊन सांगतांना दिसत आहे.
कोविड काळात हे नागपूरच्या बंगल्यावर बसून होते, आपण यांना पाहिलंत का असे इथल्या जनतेने पोस्टर लावलेत, इथल्या जनतेची काळजी आम्ही घेतली. असे विधान करीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी अप्रत्यक्ष विजय वडेट्टीवार यांना टोला हाणला. आपल्या भाषणात विकास पुरुष असे म्हणत अप्रत्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना टारगेट केल्याचे धानोरकर भासवत असले तरी त्यांनी दिलेले उदाहरण आणि त्यांचा रोख हा तेंव्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावरच असल्याचे आता बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे धानोरकर यांनी आपण यांना पाहिलंत का असे पोस्टर लावल्याचे सांगितले, असे पोस्टर विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भातच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते हे उल्लेखनीय. "सासू बोले अन सुने लागे" असाच हा प्रकार असल्याचे आता राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. विजय वडेट्टीवार हे प्रतिभा धनोरकर यांच्या प्रचारात अजूनही उतरले नसल्याचा राग तर ते काढत नाहीत ना अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कोरोना काळात विजय वडेट्टीवार जिल्ह्याचे पालकमंत्री होते, जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. खनिज विकास निधी मधील मदतीचे किट विजयवाडा ते "वार" एकटेच वाटप करीत आहे असा आरोप त्यावेळी बाळू धानोरकर यांनी केला होता.यावरूनच कुणाल खेमणार ची बदली झाली होती. वडेट्टीवार यांचाअधिकाधिक वेळ हा त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जात होता. नुकतेचं काही दिवसांपूर्वी कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या प्रचार सभेत या बाबींचा उल्लेख करीत "हे महाशय नागपूर च्या बंगल्यात होते.....! त्यांच्या हरवले आहे या आशयाच्या सोशल माध्यमांवर पोस्ट फिरल्या होत्या. "या आशयाचे संबोधन केले होते. "अजाणता"- "अज्ञात मुळे" हे घडले की प्रतिभा धानोरकर या मुद्दाम विजय वडेट्टीवार यांना ट्रोल करीत आहेत, याची चर्चा आता कांग्रेस पक्षांमध्ये होऊ लागली आहे.
महत्वाचे म्हणजे कोविड काळात सुधीर मुनगंटीवार फक्त आमदार होते. या काळात त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत भरपूर मदत ही वाटप केलेले होते, हे अजून जनता विसरली नाही. चुकीचे वृत्त, व्हिडिओ माध्यमातून पसरवून मतदारांची दिशाभूल करण्याची लाजीरवाणी खेळी आता सुज्ञ-सुजाण जनतेच्या लक्षात आली आहे, परंतु आपल्याचं वरिष्ठ नेत्यांना ट्रोल करण्याचा प्रकार मात्र जनता, कांग्रेसी खपवून घेणार नाही. मतांचा जोगवा मागण्यासाठी खोट्या प्रचाराचा होत असलेला खेळ व विजय वडेट्टीवार सारख्या आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्याला "ट्रोल" करण्याच्या खेळीने काॉंग्रेसच्या गटात असंतोष पसरत आहे.