Top News

भाजपचे चंद्रपुरातील संघटन नियोजनबद्ध! #Chandrapur #ballarpur


भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचा दावा

चंद्रपूर:- चंद्रपुरातील संघटन अतिशय मजबूत असून निवडणूक नियोजनबद्धरीतीने पार पडली, असा दावा भाजपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केला आहे.


चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चंद्रपूरमध्ये नियोजनाचा अभाव होता व काही पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. हे अतिशय निराधार वृत्त असून यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे हरीश शर्मा यांनी म्हटले आहे.


शहर व ग्रामीण भागात नियोजनबद्ध पद्धतीने काम केले गेले नसल्याची तक्रार भाजप व संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली आणि मुनगंटीवार यांनी स्वतः भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पावडे आणि भोंगळे यांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ग्रामीण व शहराची कार्यकारिणी बदलण्याच्या तयारीत असल्याचेही वृत्त काही माध्यमांमधून प्रकाशित केले जात आहे. हे असत्य आहे, असा दावा शर्मा यांनी केला.


या संपूर्ण निवडणुकीत पावडे असो किंवा भोंगळे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत परिश्रम घेऊन निवणुकीत सहभाग नोंदवला. पक्षाच्या बैठकीत केवळ मतदार यादीतून मतदारांची नावे गहाळ झाल्याबद्दल चर्चा होती. बैठकीविषयी वेगवेगळे अर्थ काढून कुणी काहीही बातम्या प्रकाशित करीत असतील, तर ते सर्वथा चुकीचे आहे, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने