Top News

कोणत्या ग्रहातून आलेय "हे"? #Chandrapur #chandrapurloksabha #Chandrapurpolice


सायबर सेलची यांचेवर कडक नजर?

चंद्रपूर:- देशामध्ये लोकशाही चा सगळ्यात मोठा उत्सव सुरू आहे. या उत्सवाला ग्रहण लावण्यासाठी आलेले विघ्नसंतोषी यांच्यावर सायबर सेल नी नजर ठेवण्याची गरज आहे. हे विघ्नसंतोषी दुसऱ्या ग्रहावरून तर आले नाही नां? यावर करडी नजर संबंधितांनी व ज्यांना हे आढळतात, त्यांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

निवडणुक आयोगाने पाच वर्षांतून एकदा येणारा भारतीय लोकशाही चा हा मोठा उत्सव उत्साहाने साजरा करण्यात यावा, या उद्देशाने आदर्श आचारसंहिता नावाची नियमावली बनविली आहे, या नियमावलीचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येण्याचे सर्वांना बंधनकारक आहे. परंतु या आदर्श आचारसंहितेचा जाणिवपूर्वक भंग करणारे "कोणत्या दुसऱ्या ग्रहातुन आलेले हे विघ्नसंतोषी...! लोकशाही चा उत्सव साजरा होत असतांनाच मागील एक-दोन दिवसांपासून कुठे कोण विजयी होणार? (उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले असतांना व विजयाची ची कल्पना उमेदवार व मतदारांना ही नाही?) यांची "भुताडकी" सांगण्यात तल्लीन होऊन गेले आहेत‌. आदर्श आचारसंहिता भंग करणाऱ्या या दुसऱ्या ग्रहांचे "भुतात्मे-प्रेतात्मे" यांची ही भुताडकी कशाच्या आधाऱ्यावर आहे, याकडे निवडणुक आयोगाने लक्ष पुरवून या "दुसऱ्या ग्रहावरील आलेल्यांवर वचक बसवावा" व लोकशाही चा हा उत्सव "भुताडकी"विना साजरा व्हावा, अशी मागणी येथील जागरुक मतदार करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने