शिवसेना (उबाठा) माजी महानगर प्रमुख मनोज पाल यांचा भाजप प्रवेश #chandrapur #chandrapurloksabha

चंद्रपूर:- मनोज सुकुमार पाल यांनी 1995 ला महाविद्यालयीन विद्यार्थी असताना हिंदूहृदयसंघाट आदरनिय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारने प्रभावित होऊन वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला. वरिष्ठ पदाधिका-यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिक महणून कार्याला सुरुवात केली. पुढे विद्यार्थी सेनेच्या शाखा संघटक ते जिल्हा संघटक 2005 पासून 2016 पर्यंत पदावर कार्यरत असताना अनेक आंदोलने करत सामान्य विद्यार्वांना न्याय मिळवून देत असताना स्वतः वर विविध 21 फौजदारी गुन्हे अंगावर घेत जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये निवडनुका जिंकून भगवामय वातावरण विद्यार्थीवर्गात निर्माण करण्यात यशस्वी कामगिरी त्यांनी केली.

2019 साली शिवसेनेन्या जिल्ह्यातील मुख्य कार्यकारणीत चंद्रपूर शहर (महानगर) प्रमुख्य पदि कार्य करण्याची संधी मिळाली. तत्कालीन शिवसेना नेते गजानन किर्तिकर संपर्क नेते असताना कोणतीही विचारपूस न करता पदमुक्त केले. त्यानंतर ज्या स्पेकांना मी पक्षाचे ध्येयधोरण समावत पक्षात आपले त्यालोकांना पदाधिकारी बनवत मागील चार वर्षापासून वरिष्ठ संपर्क नेते, पदाधिकारी फक्त जातीय समिकरणावरुन मला डावलण्यात आले, तरिही चंद्रपूर शहरातील माझे कार्यालय व सर्व शाखा आम्ही सुरु ठेवून सामन्य शिवसैनिकाने कार्य सुरु ठेवले होते. मात्र 27 फेब्रुवारी 2024 ला व्यक्तिगत कारण्यास्तव पक्षाच्या (उबाठा) शिवसेना गटाचा स्वेच्छिक राजिनामा त्यांनी पक्षश्रेष्ठी कडे मुंबई येथे जाऊन सोपवीला होता.

त्यानंतर आज लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेऊन त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या