सरपण गोळा करणाऱ्या तिघींवर अस्वलांचा हल्ला #chandrapur #gadchiroli #Bhamragarh

भामरागड:- गावालगतच्या जंगलात सरपण गोळा करणाऱ्या तीन महिलांवर तीन अस्वलांनी हल्ला केला. आरडाओरड केल्याने अस्वलांनी जंगलात धूम ठोकली. ही घटना पुसिंगटोला येथे शनिवार, २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता घडली. या महिलांवर भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी महिलांमध्ये सुनीता विलास उसेंडी, मुंगळी विजा पुंगाटी व सविता रमेश उसेंडी आदींचा समावेश आहे.

भामरागड तालुक्याच्या पुसिंगटोला येथील महिला सरपण गोळा करण्यासाठी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जंगलात गेल्या होत्या. गावाला लागूनच हे जंगल आहे. सरपण गोळा करीत असतानाच, सकाळी ११ वाजता या तीन महिलांवर तीन अस्वलांनी हल्ला केला, तेव्हा महिलांनी आरडाओरड सुरू केली.

महिलांच्या जोराच्या आवाजामुळे अस्वलांनी जंगलात धूम ठोकली. अस्वलांच्या हल्ल्यात महिला किरकोळ जखमी झाल्या. त्यांना अन्य नागरिकांच्या मदतीने भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने