मतदानाच्या दिवशी विद्यार्थ्यांची परीक्षा, विद्यापीठाने केला परिक्षेच्या तारखेत बदल! #Chandrapur #gadchiroli #Gondwanauniversity

Bhairav Diwase


विद्यार्थ्यांना मिळाला मतदानाचा अधिकार



चंद्रपूर:- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खैरी, वडकी सर्कल चे व वर्धा जिल्हातील समुद्रपुर, हिंगणघाट तालुक्यातील ज्यांची सिमा चंद्रपूर जिल्हाला लागुन आहे असे असंख्य विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या अंतर्गत वरोरा, चंद्रपूर च्या महाविद्यालयात शिकत आहे परंतु 26 एप्रिल रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे विविध विषयांच्या पेपर असल्याने विद्यार्थी वर्धा लोकसभा व यवतमाळ-वाशीम लोकसभा च्या मतदानापासून वंचित राहत होते.




हिच बाब विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे सिनेट सदस्य प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांच्या लक्षात आणुन दिली नंतर सरांनी अथक प्रयत्न करून विद्यापीठाला हा पेपर रद्द करून समोरील दिनांकास घ्यायला लावला यामुळे विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क मिळाला सर्व विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ.दिलीप चौधरी सरांचे आभार मानले.