भारतीय जनता युवा मोर्चाचे गोंडपिपरी शहराध्यक्ष प्रशांत येल्लेवार ह्यांचे राजुरा जवळ झालेल्या भिषण अपघातात जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी 10:45 वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भिषण होता की क्र. MH 34 BG 1310 क्रमांकाच्या ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांच्या डोक्याच्या भागाचा चेंदामेंदा झाला.
प्राप्त माहितीनुसार प्रशांत येल्लेवार गोंडपिपरी येथुन मागील दोन दिवसांपासून मावसभावाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सहपरिवार राजुरा येथे आले होते. मात्र आज नेमक्या लग्नाच्या दिवशीच झालेल्या भिषण अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.