चंद्रपूर:- महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी माजी नगरसेवक बलराम डोडानी व अन्य एका महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा व पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.
समाज माध्यमावर निवडणूक विभागाचे विशेष लक्ष आहे. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात दोन तक्रारी प्राप्त झाल्या. याप्रकरणी माजी नगरसेवक बलराम डोडानी व श्रीमती सोयाम या महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज माध्यमावर कोणत्याही पक्षाच्या अथवा अपक्ष उमेदवाराची कुठल्याही प्रकारे बदनामीकारक मजकूर टाकू नये. अन्यथा कारवाई करण्याचा इशारादेखील यावेळी देण्यात आला.