युवा वर्गाद्वारे पोलीस भरती तयारी जोरात! #Chandrapur #Maharashtrapolice #chandrapurpolice



महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यामुळे ग्रामीण व शहरी भागात पहाटेपासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचा सराव करताना युवक-युवती रस्त्याच्या कडेला, स्टेडियमवर, मैदानात गर्दी करून व्यायाम करताना दिसत आहेत.



अनेकांचा ओढा हा पोलीस भरतीकडे लागलेला आहे. अनेकांनी कुटुंबांना हातभार लावण्यासाठी मजुरीसुद्धा करत आहेत. कित्येक मुले-मुली शेती करणे किंवा शहरात दुकानात काम करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी कष्टाची कामे करावी लागत आहेत. शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले आहे. आपल्या मुलांना काबाड कष्टाची गरज पडू नये. त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी लागावी, अशी सर्व पालकांची अपेक्षा असते. स्वतः कष्ट करून आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न पालक वर्ग करत आहेत.


कित्येक जण पदवीधर होऊन बसले आहेत. परंतु, सरकारी नोकरी मिळत नसल्यामुळे अनेक सुशिक्षित मुले-मुली हाताला मिळेल ते काम करताना दिसून येत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.


ग्रामीण भागातील युवक बारावी झाली की अकॅडमीमध्ये आपले नाव नोंदवून पोलीस भरतीचा सराव करीत असताना यश संपादन करताना दिसत आहेत. काही तरुणांना अपयश आल्याने ते पुन्हा नव्या उमेदीने पुढील भरतीकरिता ही युवा पिढी सज्ज होत असताना दिसत आहे. भरतीमध्ये यश मिळालेले अनुभव यशस्वी झालेला तरुण-तरुणी इतरांना प्रेरणा देत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने