राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरुर स्टेशन गावात चोरांची धूमाकूळ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत दैनिक भास्कर अंकाचे विरूर स्टेशन वार्ताहर अविनाश रामटेके यांचे ३०,०००/- चे रू किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्याने पळविले तसेच वार्ताहर शाहू नारनवरे यांचे टू व्हीलर सुद्धा पळविल्याची माहिती समोर आली.
अवघ्या ७ दिवसात २ वार्ताहर यांची मोबाईल व दुचाकी चोरी झाली असून आरोपी मोकाट फिरत आहे. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर चोरांना ताब्यात घेतले पाहिजे अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहे.