Click Here...👇👇👇

संशोधन हे समाजासाठी सदैव उपयोगाचेच असले पाहिजे:- डॉ. अनिल हिरेखन #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- संशोधनाचा दर्जा टिकलाच पाहिजे.येणाऱ्या काही वर्षात गोंडवाना विद्यापीठाचा कायापालट होणार असून मोठ्या प्रमाणात संशोधन होणार असल्याची माहिती देत संशोधन हे समाजासाठी सदैव उपयोगाचेच असले पाहिजे, अन्यथा ते काहीही कामाचे राहणार नाही, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी येथे बोलताना केले. दरम्यान संशोधनाबाबत ज्या समस्या भेडसावत असतील, त्यासाठी विद्यापीठाला प्रशासकीय स्तरावर जे करता येईल ते निश्चित करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या ''इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग रिसर्च अँड स्पेशलाईझ स्टडीज'' (आयएचएल आर अँड एसएस) विभागाच्या वतीने महाविद्यालयातील आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. सरदार पटेल महाविद्यालयाच्या शांताराम पोटदुखे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे या होत्या, तर यावेळी ''स्पोर्ट्स सायकॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया''चे अध्यक्ष तथा नागपूरच्या आयडीसीपीईचे माजी प्राचार्य डॉ. अनिल करवंदे, एसएनडीटी विद्यापीठाच्या बल्लारपूर केंद्राचे संचालक प्राचार्य डॉ.आर.पी. इंगोले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार व आयएचएलआर अँड एसएस समन्वयक डॉ. रक्षा प. धनकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. अनिल करवंदे म्हणाले की, आचार्य पदवी प्राप्त करत असताना विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीपासूनच अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अलीकडे ''सॉफ्टवेअर'' व आधुनिक तंत्रज्ञानामुळे बराचसा वेळ संशोधकांचा वाचत असल्याचे त्यांनी नमूद केले.

समाजाच्या व राष्ट्राच्या उपयोगी पडेल असे संशोधन होणे आवश्यक आहे. यासाठी गांभीर्याने विचार करण्याची गरज असून राष्ट्र उभारणीत हातभार लावण्यास ते महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना सुधाताई पोटदुखे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी.एम.काटकर म्हणाले की, संशोधन करताना संशोधनकर्त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, त्या समस्या सविस्तरपणे मांडत विद्यापीठाने त्यावर गांभीर्याने पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी डॉ. रक्षा धनकर यांनी ''इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग रिसर्च अँड स्पेशलाईझ स्टडीज'' या विभागाचा एकूणच लेखाजोखा प्रस्तुत केला. यावेळी आचार्य पदवी प्राप्त २२ प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.अजय बेले, डॉ.कुलदीप गोंड, डॉ.पंकज मोहरीर,डॉ. शितल कटकमवार व डॉ. दीपाली दांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुमेधा श्रीरामे व प्रा. सुषमा टेकाडे, तर आभारप्रदर्शन डॉ. सपना वेगिनवार यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ,स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या २२ जणांचा झाला सत्कार

डॉ. वंदना गिरडकर, डॉ. पंकज ढुमने, डॉ. अजय बेले, डॉ. दिलीप वाहणे, डॉ. प्रफुल्लकुमार वैद्य, डॉ. कुलदीप गोंड, डॉ. राजकुमार बिरादर, डॉ. निखिल देशमुख, डॉ. पंकज मोहरीर, डॉ. शीतल कटकमवार, डॉ. भारती दिखित, डॉ. दयानंद हिरेमथ, डॉ. संदीप गुडेल्लीवार, डॉ. प्रणव मंडल, डॉ.परितोष मिश्रा, डॉ. माधुरी राखुंडे, डॉ. सुमिता चिटमलवार, डॉ.शीतल चव्हाण, डॉ. शीतल निमगडे, डॉ. दिपाली दांडेकर, डॉ आम्रपाली एस.,डॉ. आरती दाचेवार.


 #Sudhir Mungantiwar #pratibhadhanorkar #VijayWadettiwar #ShivaniWadettiwar #Subhashdhote   #Sudhir Mungantiwarvspratibha dhanorkar #chandrapurloksabha #chandrapurloksabha2024 #BJPvsNCP #ajitpawar #sharadpawar #ncp #eknathshinde #monsoon2024 #kishorjorgewar #shindefadnavisgovernment #devendrafadnavis #jitendraawhad #prafulpatel #chhaganbhujbal #maharashtrapolitics #Adharnewsnetwork #marathinewslive #marathinewsadharnewsnetwork #maharashtranewsadharnewsnetwork #marathibatmyanewsAdharnewsnetwork #live #ChhatrapatiSambhajinagar #MahavikasAghadiSabha #ThackerayGroup #Congress #NCP #BJP #chandrapur #gadchiroli #Nagpur #Maharashtra #Vidharbh #bhairavdiwase #murder #SupremeCourtHearing #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #vidhansabha #EknathShinde  #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #N #maharashtrapolitics #rainupdate