माजी आमदार संजय धोटे , भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे मध्यरात्री धरणे आंदोलन Rajura chandrapurराजुरा:- श्रीराम नवमी प्रित्यर्थ लावण्यात आलेले बॅनर नगरपरिषदे द्वारा काही वेळापूर्वी काढण्यात आल्याने राम भक्तांनी एकत्र येऊन नगरपरिषदेच्या विरोधात नाका नंबर तीन येते चक्काजाम आंदोलन पुकारले आहे.
राम भक्तांनी नगर परिषद मुख्याधिकारी जाधव यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. रामभक्तांनी आरोप लावले आहे की नुकतीच रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्याने शहरात बॅनर लावण्यात आलेले होते, मात्र नगरपरिषदे द्वारा फक्त श्रीरामनवमीच्याच बॅनरवर अशी कारवाई करण्यात आली. माजी आमदार संजय धोटे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे मध्यरात्री धरणे आंदोलनाला आंदोलन बसले असून मुख्याधिकाऱ्याला त्वरित बडतर्फ करण्याची मागणी या चक्काजाम आंदोलनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आंदोलनाला जवळपास एक तास झाले असून रस्त्याच्या दोन्हीकडून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या