Top News

श्रीराम द्वेषी मुख्याधिकाऱ्याचा जाहीर निषेध!

देवराव भोंगळे यांची संतप्त प्रतिक्रिया 

राजुरा:- रामनवमीच्या शुभपर्वापर राजुरा शहरातील नाका नं. ०३ परीसरात धार्मिक संघटनेच्या वतीने लावण्यात आलेले बॅनर फाडण्याचे अधर्मी पातक राजुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. जाधव यांनी मध्यरात्रीच्या सुमारास केले. एकीकडे संपूर्ण देशात प्रभू श्रीरामलल्लांची अयोध्या येथील राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाल्याने सबंध भारतवर्षात आनंद निर्माण झाला आहे. परंतू हिंदूद्वेशी मुख्याधिकारी जाधवने आज राजुऱ्यात केलेले अधर्मी कृत्य हे निचतेचे कळस आहे. त्यांच्या या कपटी व हिंदूधर्मविरोधी कृतीचा मी जाहीर निषेध करतो. 

राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी, कोरपना व जिवती तालुक्यातील धार्मिक बॅनरना परवाणगी नाकारणे आणि राजुऱ्यात चक्क प्रभू श्रीरामनवमीच्या शुभेच्छा देणारे बॅनर फाडणे हे महापाप त्यांनी जानून बुजून केल्याची वास येत आहे अशी स्थानिकांची भावना असून यात कोणतेही दुमत नाही. 

जोपर्यंत प्रशासनाकडून 'हिंदूद्वेशी किड' असलेल्या या जाधव वर तात्काळ निलंबनाची कारवाई होणार नाही. तोपर्यंत आम्ही याठिकाणी सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही. 

जय जय श्रीराम! 🚩

*श्रीरामभक्त - देवराव भोंगळे*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने