भद्रावती:- अवकाळी वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील विद्युत खांब वाकलेले असून अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त अवस्थेत आहे. यामुळे अनेक ठिकाणी कृषी पंपांचा विद्युत पुरवठा प्रभावित झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील भोजवार्ड, किल्ला वार्ड या भागांसह अनेक ठिकाणी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ऐन उकाड्याच्या दिवसात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या बाबीची त्वरित दखल घेऊन व आवश्यक त्या दुरुस्त्या करून ग्रामीण भागातील कृषी पंपांचा व शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा यासाठी भद्रावती भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख यांच्या नेतृत्वात येथील वीज वितरण कंपनी कार्यालयात सहायक अभियंता यांना एक निवेदन सादर करण्यात आले.
सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात होत आहे. मात्र अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त अवस्थेत असल्याने कृषी पंपांचा विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे शेती हंगामाची कामे प्रभावित झाली असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.या बाबीची त्वरित दखल न घेतल्यास या विरोधात जन आंदोलन उभारण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित सिकंदर शेख भाजपा चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष, प्रवीण सातपुते शहराध्यक्ष, पप्पू शेख, रुपेश मांढरे जिल्हा सचिव युवा मोर्चा, किशोर गोवारदिपे, प्रीतम देवतळे, सुरज पेंदाम, विकी सोनुने, श्याम मानकर, प्रवीण सिंग, उत्तम पोईनकर, सचिन नारायणे तथा भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.