रविंद्र तेलसे यापूर्वी भारतीय बौध्द महासभेच्या समता सैनिक दलाच्या उपाध्यक्ष पदी कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गावागावात समता सैनिक दलाचे शिबीर घेऊन समता सैनिक दल खूप वाढविलं भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव म्हणून कार्यरत आहेत ते आपल्या परिसरातील गरजवंतांच्या किंवा अडचणीत असलेल्या लोकांच्या मदतीस धावून जाण्याचं काम सदैव करीत असतात, त्यांनी अनेक रक्तदान शिबीर लावून स्वतःही रक्तदान केलं व गरजून्ना रक्ताचा पुरवठा करण्याचं काम केलं आणि आजही गरजू लोकांच्या मदतीस धावून जाण्याचं काम नेटाने करत आहेत. आणि आज त्यांच्या कार्याची पावती म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आले.
त्यांच्या नियुक्ती बद्दल श्यामकुमार गेडाम, ऍड.रंजित खोब्रागडे अतुलभाऊ वाकडे, अविनाश वाळके, डाँ. राजपाल खोब्रागडे डाँ.मदनजी रामटेके,राजूभाऊ खोब्रागडे,तृप्ती मेश्राम,रिनाताई उराडे संजितजी टाकरी, अजय उराडे, पराग उराडे, रुपेश वनकर बेबीताई वनकर, आकाश वाकडे, आशु उराडे, अनिल वाकडे, शुभम उराडे, प्रकाश अर्जुनकर, शैलेंद्र तेलसे, अनमोल मोहुर्ले,अरिय अनुप मानकर ईश्वर तेलसे, दामोधर वनकर आदिनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले तसेच त्यांच्या मित्र परिवाराकडून कौतुक केले जात आहे.