कोरची:- विहीर खोदकामासाठी ट्रकमधून पोकलेन नेताना महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील छत्तीसगडमधील पाटणखास गावाजवळ विद्युत तारेला स्पर्श झाला, यात ऑपरेटरचा मृत्यू झाला. ही घटना १७ मे रोजी दुपारी १२ वाजता घडली.
चेतन शंकर आदे (२५, रा. गांधीनगर, देसाईगंज) असे मृताचे नाव आहे. १७ मे रोजी जामणारा येथून बंधाऱ्याचे खोदकाम करून कोटगुल येथे विहीर खोदकाम करण्यास ट्रकमधून (एमएच ४० बीजी-१६३८) पोकलेन घेऊन जात होते. छत्तीसग डसीमेवरील ११ केव्हीच्या विद्युत तारांना स्पर्श झाला. त्यामुळे ऑपरेटर चेतन याला विजेचा जोरदार झटका बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पाटणखास पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यानंतर, तो नातेवाइकांकडे सोपविला.