प्रशासनाची मोठी कारवाई! #Chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
जिल्ह्यात 80 लाख रुपयांची चोर बीटी बियाणे जप्त

चंद्रपूर:- जिल्हा परिषद कृषी विभागाने मोठी कारवाई करीत तब्बल 80 लाख रुपयांचे चोर बीटी बियाणे जप्त केले आहे. जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी गावातील शेतातील घरात भरारी पथकाने अनधिकृत बियाणांचा साठा हस्तगत केला. प्रशासनाच्या या कारवाईने चोर बीटी तस्करात एकच खळबळ माजली आहे. ही सर्वात मोठी कारवाई मानली आहे.

आरोपी नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील घरात 39.88 क्विंटल संशयास्पद चोर बीटीचा मोठा साठा मिळाला. 76 लाख रुपयाचे हे बियाणे असून प्रशासनाने हा माल ताब्यात घेतला आहे. अनधिकृत संशयित कापूस बियाण्याचा साठा इतरत्र परिसरात कुठेही विक्री केली आहे काय याचा तपास कृषी विभाग व पोलीस विभाग करीत आहेत. शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. याची तयारी म्हणून चोरबीटी तस्कराचे मोठे जाळे जिल्ह्यात सर्वत्र पसरले आहेत. अशात प्रशासनाने केलेल्या या मोठ्या कारवाईने तस्करात चांगलीच खळबळ माजली आहे.

अनधिकृत चोर बिटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही. कृषी विभाग ने अनधिकृत बियाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक केली आहे. आपल्या परिसर संशयास्पद अनधिकृत बियाणे साठवणूक व विक्री होत असेल तर त्याची माहिती कृषी विभागला देण्याच आवाहन करण्यात आल आहे.