फावडा डोक्यात घालून महिलेसह तरुणाची हत्या
नांदेड:- किनवटमध्ये घराचं बांदकाम करणाऱ्या मिस्त्रीसह एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी उत्तम भरणे याला अटक केली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावऱण निर्माण झालं आहे. मिस्त्री काम करणाऱ्या युवकाने घरमालकाकडे पिण्यासाठी पाणी मागितल्याने त्याचा आणि अन्य एका महिलेचा खून घरमालकाने केला अशी फिर्याद मयत युवकाच्या भावाने पोलीसात दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, किनवट जवळच्या अंबाडी येथे मिस्त्रीकाम करण्यासाठीं शेख वसीम हा युवक गेला. उत्तम भरणे यांच्या घरी काम सुरू होतं. वसीम याने पिण्यासाठी उत्तम भरणे यांच्याकडे पाणी मागितले. त्यातून वाद होऊन भरणे याने फावड्याने वसिमच्या डोक्यात वार केला यात तो मरण पावला. तेव्हा शेजारील 50 वर्षीय महीला विशाखा मुनेशवर ही भांडण सोडण्यासाठी आली. आरोपी उत्तम भरने याने तिला देखील फावड्याने मारले. उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला असं पोलीस तक्रारीत म्हटल आहे.