सदर घटना २८ मे ला संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक वैभव हा चेक पोंभूर्णा येथील रहिवासी असून तो कुकचे काम करीत होता.काही महिन्यांपूर्वी तो कुकचे काम सोडला होता.या दरम्यान त्याच्याकडे कोणताही काम नसल्याने तो मानसिक नैराश्यात गेल्याने दारुच्या आहारी गेला होता.
दि.२८ मे मंगळवारला वैभव दुपारी शौच्याच्या निमित्ताने घराबाहेर पडला व घरापासून काही अंतरावर असलेल्या मनोज बुरांडे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.सदर घटना संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान उजेडात आली.पोंभूर्णा पोलिसांनी पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात येथे शवविच्छेदन करण्यात आले.