वाघाच्या हल्ल्यात महिला ठार #chandrapur #tigerattack #sindewahi

Bhairav Diwase

सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील पेटगाव-खातेरा बीटात कक्ष क्रमांक ३२२ मध्ये बामणी (माल) येथील दीपा दिलीप गेडाम (३५) ही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवार ४ मे रोजी सकाळी उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाहीचे ठाणेदार तुषार चव्हाण, वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी झुडपात दीपा हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. यावेळी शिवणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, क्षेत्र सहाय्यक एस .वाय .बुले, क्षेत्र सहाय्यक पेंदोर, वनरक्षक मडावी घटनास्थळी हजर होते. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर तत्काळ आर्थिक मदत देऊन मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात आला.