तहसिलदारसह नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात #Gondia #ACB

Bhairav Diwase
0

वाळू वाहतूक प्रकरणी लाच घेणं चांगलंच भोवलं

गोंदिया:- जिल्ह्यातील महसुल विभागाला हादरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. गोंदिया (GondiaNews) जिल्ह्यातील गोरेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ( ACB Trap) मोठी कारवाई केली आहे.

यात गोरेगावचे तहसीलदार किसन भदाणे यांच्यासह नायब तहसिलदार नागपुरे आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे. तर या तिघांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणाची कारवाई अगोदर गोरेगाव तहसिल कार्यालयात करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व संशयित आरोपींना पुढील तपास आणि कारवाई करिता गोंदिया येथील कार्यालयात आणण्यात आले आहे.

वाळू वाहतूक प्रकरणी लाच घेणं चांगलंच भोवलं

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या गावातील एका फिर्यादीने तक्रार दिली होती. दिलेल्या या तक्रारीनुसार तहसीलदार भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार दिली होती. यात गोरेगावचे तहसीलदार किशन के. भदाणे, नायब तहसिलदार नागपुरे आणि गणवीर नामक एक खाजगी व्यक्तीचा समावेश आहे. हे प्रकरण उघडकीस येताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)