सुरजागढ प्रकल्पाच्या विरोधात विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन #Gondpipari #chandrapur

Bhairav Diwase
गोंडपिपरी:- सुरजागढ येथील लोहखनिज आणण्याकरीता चंद्रपूर- गोंडपिपरी-आष्टी मार्गावरून दररोज शेकडो हायवाची वाहतुक सुरु असुन तालुक्यात अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस सुरजागढ येथील वाहतुकीमुळे गोंडपिपरी शहरात अपघाताचे प्रमाण वाढत असुन अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या विरोधात विविध मागण्या घेत दिनांक 14 जून 2024 रोज शुक्रवार सकाळी 10.00 वाजता पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक गोंडपिपरी येथे सर्वपक्षीय, सामाजिक संघटना, तसेच व्यापारी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

प्रमुख मागण्या.....

1) सूरजागड प्रकल्पाच्या वाहतुकीमुळे निर्मान झालेल्या समस्या त्वरीत निकाली काढण्याबाबत,

2) सुरजागड येथील वाहतुक शहरातून सायं. 7.00 ते सकाळी 7.00 पर्यंत पुर्णतः बंद करावी.

3) राष्ट्रीय महामार्गावर कंपनीचे वाहने उभी न करता कंपनीने स्वतःची व्यवस्था करावी. त्याच ठिकाणी वाहने उभी ठेवावीत.

4) अपघातात मृत पावलेल्या कुटुंबांना १० लाख रुपये मदत देन्यात यावी. जखमींना ५ लक्ष रू. देण्यात यावे. यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी देण्यात यावी, अपघातात नुकसान झालेल्या गाड्यांची व घरांची नुकसान भरपाई देण्यात यावी.

5) अपघाताची मालीका लक्षात घेता केंद्र सरकार व राज्य सरकारनी शहरातून वळन रस्ताला मंजुरी देवून जड वाहतूक करिता बायपास मार्ग काढावा.

6) शहरात वाहनाचा वेग हा शहरातून २० की.मी. प्रती तासापेक्षा अधिक नसावा

7) महामार्गाला अडसर करत असलेल्या शहरातील अतिक्रमन हटविण्यात यावें.शहरातील सर्व्हिस रोड ओपनस्पेस मोकळे करण्यात यावे.

8) तालुक्यात सुरक्षारक्षक भरती प्रक्रीयेत स्थानिकाना प्राधान्य देण्यात यावे.