महाराष्ट्रात 15 आमदार लोकसभेच्या रिंगणात
यंदाची लोकसभेची निवडणूक विविध अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात एक-दोन नव्हे तब्बल 15 विद्यमान आमदार हे खासदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यातील दोन आमदार हे राज्याचे मंत्री आहेत.
खरतर आमदारकीचा थाट काही औरच असतो. तालुक्यात आमदार महोदय म्हणून मोठा रुबाब असतो. स्थानिक राजकारणात दबदबा असतो. त्यामुळे अनेकजण दिल्लीत जाण्यासाठी नाखूष असतात. यंदाची लोकसभा निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली आहे. महाराष्ट्रात तब्बल 15 विद्यमान आमदार हे खासदार होण्यासाठी निवडणूक लढवतायेत. त्यातील दोन आमदार राज्याचे मंत्री आहेत. तर दोन आमदार विधान परिषद सदस्य आहेत. या आमदारांना आता खासदारकीचे वेध लागले असून, संसद प्रवेशाच्या ते प्रतीक्षेत आहेत.
कोणते आमदार खासदारकीची स्वप्नं पाहतायेत? ते पाहूया
1 विकास ठाकरे- कॉंगेस
(मविआ)
आमदार नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ
चंद्रपूर लोकसभा
2 वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - भाजप (महायुती)
आमदार - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ
चंद्रपूर लोकसभा
3 - प्रतिभा धानोरकर - काँग्रेस (मविआ)
आमदार - वरोरा विधानसभा मतदारसंघ
4 - बळवंत वानखेडे - काँग्रेस (मविआ)
आमदार - दर्यापूर विधानसभा मतदारसंघ
5 राम सातपुते भाजप (महायुती)
आमदार - माळशिरस विधानसभा मतदारसंघ (माढा लोकसभा)
6 प्रणिती शिंदे- काँग्रेस (मविआ)
आमदार - सोलापूर शहर मध्य मतदारसंघ
सातारा लोकसभा
7 शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी शरद पवार गट (मविआ)
आमदार - विधान परिषद
8 रोहयो मंत्री संदीपान भुमरे - शिवसेना शिंदे गट (महायुती)
आमदार - पैठण विधानसभा मतदारसंघ (जालना लोकसभा)
9 रवींद्र धंगेकर - काँग्रेस (मविआ)
आमदार - कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
10 यामिनी जाधव - शिवसेना शिंदे गट (महायुती)
आमदार - भायखळा विधानसभा मतदारसंघ
11 वर्षा गायकवाड - कॉंग्रेस (मविआ)
आमदार - धारावी विधानसभा मतदारसंघ
12 मिहिर कोटेचा - भाजप (महायुती)
आमदार - मुलुंड विधानसभा मतदारसंघ
13 रवींद्र वायकर - शिवसेना शिंदे गट (महायुती)
आमदार - जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ
14 महादेव जानकर - रासप (महायुती)
आमदार विधानपरिषद
15 राजेश पाटील
बहुजन विकास आघाडी
आमदार बोईसर विधानसभा मतदारसंघ
लोकसभा निवडणुकीत पारनेरचे नीलेश लंके आणि उमरेडचे राजू पारवे हे दोन माजी आमदारही आपलं नशीब आजमावताहेत. निलेश लंके दक्षिण नगरमधून तर राजू पारवे रामटेकमधून निवडणूक लढवतायेत. निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वी आणि राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. या 13 पैकी किती आमदारांचं खासदारकीचं स्वप्न पूर्ण होणार आणि किती जणांचं भंग पावणार हे येत्या 4 जून रोजीच कळणार आहे.
माहिती संकलन...