भावली धरणामध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू #nashik #chandrapur

Bhairav Diwase
0
नाशिक:- नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील धरणावर गेलेल्या पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.

पाच जणांच्या मृत्यूने गोसावी वाडीमध्ये शोककळा पसरली आहे. दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले मात्र अंदाज न आल्याने ते बुडू लागले तेव्हा इतरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला खरा पण उलटच घडलं. सर्वांचा म्हणजेच पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

अनस खान दिलदार खान, वय 17 वर्ष, नाझिया इमरान खान, वय – 15 वर्ष, मीजबाह दिलदार खान, वय – 16 वर्ष, हनीफ अहमद शेख, वय – 24 वर्ष, ईकरा दिलदार खान, वय 14 वर्ष या सर्वांचा बुडुन मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गोसावीवाडीत शोककळा पसरली असुन नातेवाईकांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती. सर्वांचा मृत्यु झाल्याने या सर्वांना पाण्या बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी धाव घेवुन मदतकार्य करत हे सर्व मृतदेह इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)