चंद्रपूर:- दि. 26 जुन जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्य चंद्रपूर पोलीसांतर्फे एकुण 54 किलो 645 ग्रॉम अमली पदार्थ नाश करण्यात आले.
दरवर्षी २६ जुन हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन पाळला जातो. नशेमध्ये अडकलेल्या एखादयाच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम होतात व एखादया व्यक्तीचे संपुर्ण आयुष्य कसे बिघडू शकते, अशा नशेत आहारी गेलेल्या लोकांचे जिवन वाचवणे, प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्या मध्ये जागरूकता करणे हा या दिवसाचा मुळ उद्देश आहे.
चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ नाश करण्याबाबत मा. जिल्हा न्यायालय व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांची परवानगी घेवून मे. सुपर्ब हॉयजेनिक डिस्पोजल (इंडीया) प्रा. लि., एमआयडीसी चंद्रपूर येथे 54 किलो 645 ग्रॉम अंमली पदार्थ जिल्हा ड्रग्ज डिस्पोजल कमिटी चंद्रपूर यांचे कडुन पंचासमक्ष जाळुन नाश करण्यात आला.
सदर अमली पदार्थ नाश करतांना मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रिना जनबंधू, पोलीस निरीक्षक स्थागुशा, श्री. महेश कोंडावार, सपोनि श्री. नागेशकुमार चतरकर, पो. स्टे. पडोली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार हजर होते.