राजुरा:- शिक्षण विभाग , पंचायत समिती राजुरा आणि सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न कार्यशाळेचे आयोजन गटसाधन केंद्र, पंचायत समिती राजुरा येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मनोज गौरकार, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा हे होते. तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून शुभांगीताई लाड, जिल्हा समन्वयक, सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई आणि प्रमुख अतिथी म्हणून संजय हेडाऊ, विस्तार अधिकारी (शिक्षण), प्राचार्य छायाताई मोहितकर व सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व उपक्रम प्रमुख शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोज गौरकार, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती राजुरा यांनी, माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या व्यसनाधीनतेचे त्यांना आलेले अनुभव कथन केले व राजुरा तालुक्यातील सर्व शाळा नव्या ९ निकषांची पूर्तता करून लवकरच तंबाखू मुक्त शाळा होतील, असा विश्वास व्यक्त केला.
प्रमुख मार्गदर्शक शुभांगीताई लाड, जिल्हा समन्वयक, सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई यांनी दोन्ही टप्प्यात आयोजित केलेल्या कार्यशाळेचा व तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न शाळा उपक्रमाचा आढावा घेऊन समस्यांबाबत समर्पक मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक मनिष अशोकराव मंगरूळकर सर, विषय शिक्षक मूर्ती, जहीर खान , विषय शिक्षक पाचगाव, रामरतन चापले, स.शि. नलफडी, गिरीश कडूकर, माध्यमिक शिक्षक, शिवाजी हायस्कूल राजुरा, पि.एस. सालवटकर , जिजामाता हायस्कूल राजुरा यांनी तंबाखू विषयक भयावह सद्य:स्थिती विषद करून तंबाखू विरोधी सविस्तर मार्गदर्शन केले.
केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सुचनेनुसार निश्चित करण्यात आलेल्या ९ निकषांचे पुरावे तंबाखू मुक्त शाळा या एपमध्ये अपलोड करण्याबाबत यथायोग्य दिशादर्शन मनिष मंगरूळकर यांनी केले. तर जहीर खान यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी विषद करून प्रत्यक्ष अंमलबजावणी बाबतचे नियोजन सादर केले.
तंबाखू मुक्त शाळा उपक्रमाची गरज व महत्त्व याबाबतचे दिशादर्शन संजय हेडाऊ, विस्तार अधिकारी शिक्षण यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष अशोकराव मंगरूळकर, विषय शिक्षक मूर्ती यांनी केले.
कार्यशाळेच्या नियोजनबध्द आयोजनामध्ये पंचायत समिती राजुरा येथील सर्व विस्तार अधिकारी व सर्व केंद्र प्रमुख आणि सर्व विषय तज्ज्ञ मुसा शेख, राकेश रामटेके, रिता देरकर, गिताताई जांभूळकर, ज्योतीताई गुरनुले, देवेंद्र रहांगडाले , राजकुमार भुरे, आशिष बहादुरे, मनिषा वांदिले , दिवाकर चाचरकर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संगणक तंत्रज्ञ असलेले डेटा एन्ट्री ऑपरेटर श्री राहुल रामटेके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उपस्थित सर्व उपक्रम प्रमुख शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या सकारात्मक सहकार्याने राजुरा तालुक्यातील सर्व शाळा लवकरच तंबाखू मुक्त शाळा होतील या विश्वासासह तंबाखू मुक्त जीवनाचा संकल्प करून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.