इंडिया आघाडी च्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी भरघोस मताने विजय झाल्याबद्दल आम आदमी पक्ष राजुरा तर्फे जल्लोष करण्यात आला.

Bhairav Diwase
इंडिया आघाडी च्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी भरघोस मताने विजय झाल्याबद्दल आम आदमी पक्ष राजुरा तर्फे जल्लोष करण्यात आला.


राजुरा:- सविस्तर वृत्त असे की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून काँग्रेस चे एकमेव खासदार हे चंद्रपूर वणी आर्णी मतदार संघातून बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर हे निवडून आले होते.
दिवंगत खासदार बाळूभाऊ 
धानोरकर यांच्या निधना नंतर २०२४ ला लोकसभा
निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई धानोरकर यांना चंद्रपूर- वणी -आर्णी लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे (इंडिया आघाडी) कडून उमेदवारी
देण्यात आली. प्रतिभाताई धानोरकर यांच्या विरोधात भाजपा चे दिगंज नेते
श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे प्रतिस्पर्धी असताना देखील प्रतिभाताई धानोराकर यांनी तब्बल २,५३,३५६ मतांनि मुनगंटीवार यांच्या
पराभव केला आहे. धानोराकर यांना ७,४२,००८
मते मिळाली तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना
४,५०,८५२ मते मिळाली. खरंतर हा विजय इंडिया आघाडीमधील सामील असलेल्या सर्व घटक पक्ष  च्या एकत्रित येऊन बीजेपी विरोधी प्रचार तथा जनजागृती केल्यामुळे मिळाला हे निश्चित. या इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पक्षाची देखील भूमिका महत्त्वपूर्ण होती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम आदमी पक्ष राजुरा विधानसभा क्षेत्रात सह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील आप चे पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला त्या प्रयत्नाचे आज प्रतिभाताई धानोरकर यांच्या रूपाने विजयी/यश प्राप्त झाल्याने इंडिया आघाडी मधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तथा सहकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले याच उत्साहात आज दिनांक:- ४ जून २०२४ ला निकाल लागताच श्री. सुरजभाऊ ठाकरे- कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांच्या उपस्थितीमध्ये आम आदमी पक्ष राजुरा जनसंपर्क कार्यालय समोर फटाके फोडून व कार्यकर्त्यांना पेढे वाटून उत्साहात जल्लोष व्यक्त करण्यात आला.