वादळी वाऱ्यामुळे घराच्या छतासह अँगलला बांधलेला झोपाळा उडाला buldhana chandrapur death

Bhairav Diwase
सहा महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू


बुलढाणा:- बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे घडली आहे. काल सायंकाळी चिखली, सिंदखेडराजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. यावेळी अनेक घरांवरील छत उडून गेली. तर अनेक मोठी झाडेही उन्मळून पडली.

दरम्यान चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एक दुर्दैवी घटना घडलीय. सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने अनेक घरावरील छत उडालीत. यावेळी एका घरात छताला बांधलेल्या झोक्यात सहा महिन्यांची चिमुरडी झोपली होती. दरम्यान या वादळाने अँगलसह छत आणि चिमुकलीच्या झोकाही उडवून नेलाय. यात या सहा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात काल सलग कोसळलेल्या मान्सून पूर्व पावसासह वादळी वाऱ्याने जिल्ह्याला अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. यात अनेक ठिकाणी मोठ्या नुकसानीच्या घटना समोर येऊ लागल्या आहे. मात्र अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना देऊळगाव घुबे या गावात घडली आहे. या गावातील रहिवासी असलेले भरत मधुकर साखरे यांच्या घराचे छत वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: उडवून नेले. यावेळी घराच्या छताला एका लोखंडी अँगललला झोका बांधलेला होता आणि त्यात एक सहा महिन्याची चिमुकली झोपलेले होती.

दरम्यान सोसाट्याच्या वादळाने अँगलसह छत आणि चिमुकलीच्या झोक्यासकट उडून गेल. साधारणतः 200 फूट अंतरावर ती पत्रे जमिनीवर आदळली. या घटनेत चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सई असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून ती आवघ्या 6 महिन्यांची होती. देऊळगाव घुबे येथील भरत मधुकर साखरे यांची ती मुलगी होती. या घटनेने साखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे