चामोर्शी-जयरापूर बस लवकरात लवकर सुरु करा अन्यथा आनंदोलन करु #Chamorshi #gadchiroli
personBhairav Diwase
गुरुवार, जून २७, २०२४
share
चामोर्शी:- दि 26 जुन पासू शाळा सुरु झाली असून येणापूर येथे इंदिरा गांधी विद्यालय मध्ये मुले मुली शिक्षण घेत असून अजून पर्यंत शाळा सुरु होऊन सुद्धा बस सेवा बंद आहे तसेच कोणसरी येथे काम कंपनी मध्ये काम करण्याऱ्या मजुराणा ये जा करण्याकरिता खूप अडचण निर्माण झाली असून सदर बस सेवा सुरु करणे फार गरजेची आहे.व बँक बाजार सर्व कामे येणापूर मध्ये असल्याने सदर बस सेवा बंद असल्याने लोकांना ये जा करण्यास खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे वेळेवर बस सेवा नसल्याने सदर मार्गावर लोक पायी जात आहेत करिता सदर मार्गाची वाहतुकीची सोय अडचण लक्षात घेऊन सदर मार्गावरील बस सेवा लवकरात लवकर सुरु करण्यात यावी असे सदर परिसरातील लोकांची व विद्यार्थी मागणी करत आहेत.