तू तिच्याकडे का बघितले आणि तू तिच्याशी बोलला का? तु तिला प्रपोज केला, मी तिच्यावर प्रेम करतो, तिचं माझ्याबरोबर प्रेमप्रकरण सुरु आहे या सर्व प्रकारामुळे होणाऱ्या भांडणामुळे शहरांची बदनामी होत आहे. याला नेमकं जबाबदार कोण? याचं वाद आणि मारामारीमुळे होतायत गुन्हेगार तयार.... यामुळे नव्याने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातील युवक व युवतींचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
गेली अनेक वर्षांतील युवकांमधील भांडणाचे कारण जर बघितले तर नव्याने शहरात कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेल्या युवकांचा फायदा घेऊन दादा, भाई, भैय्या, अण्णा हे राजकारण्यांच्या मदतीने स्वतः च्या फायद्यासाठी या युवा वर्गाचा फायदा करून घेतात. सुरुवातीला या युवकांना अगदी लागेल ती मदत केली जाते आणि युवकांना व्यसनाधीन केलं जातं व आणि अचानक मदत बंद केली जाते. मग व्यसनाधीन युवकांना त्यांची तलफ भागविण्यासाठी कुणाला उचलण्याची, कुणाला मारण्यासाठी सुपारी दिली जाते, एवढेच नव्हे तर चोऱ्या-माऱ्या करायला भाग पाडले जाते, यामुळे शहरातील उद्यान, गार्डन, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन तसेच कॉलेज परिसरात अधून मधून राडे पाहिला मिळतात. यामुळे बदलत्या शहराची लफड्या पायी बदनामी खूप होते. यामुळे पालकांबरोबरच प्रशासनाने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आज गरज आहे.